करिअर कट्टा
- करिअर कट्टा
- पार्श्वभूमी
- स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी व अभ्यासिका
- उद्योजकता विकास केंद्र
- उपक्रम
- अति महत्वाचे
- सदस्य
- इतिवृत्त
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञानसहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी हा केंद्रबिंदू नजरेसमोर ठेवून आकारास येतअसलेला एक महत्त्वकांक्षी उपक्रम म्हणजे ““करिअर कट्टा".
देशाच्या उज्वल भवितव्याचा विचार करता तरूणांना आपले ध्येय आणि उद्दीष्ट गाठण्यासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे. महाराष्ट्रातील अभ्यासासाठी, शिक्षणासाठी शहरांकडे धाव घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ठिकाणी मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून देणे या उपक्रमामुळे शक्य झाले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजगारासाठी कौशल्यांची गरज लक्षात घेवून या उपक्रमांतर्गत मॉडेल कौशल्य विकास केंद्र, इंक्युबेशन सेंटर तयार करण्यात येणार असून त्यासाठी महाविद्यालयांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन या उपक्रमाचा एक भाग आहे. महाविद्यालयांना या उपक्रमांमध्ये समाविष्ट केल्याने महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये पोहोचणे आणि विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. यामध्ये महाविद्यालयीन समन्वयक, प्राचार्य प्रवर्तक नेमलेले असल्याने महाविद्यालयीन प्राचार्यांची जबाबदारी वाढलेली आहे. करिअर कट्टा अंतर्गत जिल्हा समन्वयक, विभागीय समन्वयक यांच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यत पोहोचणे सहज शक्य होणार आहे. पदवीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालक यांना राज्यातील कोर्सेसची माहिती, त्यासाठी लागणारी पात्रता, निकष, विषयाची सखोल माहिती, विविध पदांची ओळख याविषयी संपूर्ण ऑनलाईन महामेळावा अंतर्गत करून दिली जाणार आहे. तसेच १० जुलै ते १० ऑगस्ट दररोज सायंकाळी ६.०० वा. ३० तासांचा ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रमांना महत्व दिले आहे. त्यामध्ये अंतर्भूत असणारे कोर्सेस करणे करिअर कट्टा उपक्रमामुळे शक्य होणार आहे. कौशल्य अभ्यासक्रम आणि विकासासाठी मूर्त रूप देण्याचा प्रयत्न या उपक्रमांद्रारे कला जाणार आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून उच्च शिक्षण, शिक्षण संचलनालयाचे तसेच तंत्र संचलनालयाचे पत्र समाविष्ट केलेले आहे. करिअर कट्ट्याचे विद्यार्थ्यांसाठीचे उपक्रम, महाविद्यालयासाठीचे उपक्रम या विषयीची संपूर्ण माहिती या पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहे. करिअर कट्टा पदाधिकारी कार्यपद्धती, नोंदणी प्रक्रिया, दैनंदिन उपक्रम, बैठक नियोजन, महाविद्यालयीन करिअर कट्टा प्रोत्साहान स्पर्धा याचीही माहिती या अंतर्गत देण्यात आलेली आहे. करिअर कट्टा अंतर्गत काम करणाऱ्या विभागीय आणि जिल्हा समन्वयकांची यादीही माहितीसाठी यामध्ये देण्यात आलेली आहे. आपल्या विद्यार्थ्यांना रोजगारासाठी उच्च शिक्षणाबरोबरच कौशल्य आणि उद्योजकीय ज्ञान देण्याची आवश्यकता असून ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश लाभेल आणि आपण सर्व मोठ्या संख्येने याला प्रतिसाद द्याल अशी खात्री आहे.
या उपक्रमांतर्गत पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये तीस
तासांचा दोन क्रेडिट साठीचा एक कोर्स दिला जाईल. यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी या सर्व ठिकाणी असणाऱ्या नोकरीच्या संधी, त्यांची परीक्षा पद्धती, त्यांचा अभ्यासक्रम व तयारी करण्याची नियोजनबद्ध पद्धती, याविषयी मार्गदर्शन करणारा एक कोर्स दिला जाईल.
कोणत्याही पद्धतीच्या स्पर्धा परीक्षा देत असताना आवश्यक असणाऱ्या अभ्यासक्रमाचा समावेश असणारा स्पर्धा परिक्षा फौंडेशन कोर्स (२५० तास) हा पदवीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिला जाईल. संध्याकाळी पाच ते सहा दररोज एक तास.
बँकिंग क्षेत्रातील नोकरीच्या संधीसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना १२० तासांचा बँकिंग परीक्षेची तयारी करण्याचा अभ्यासक्रम पदवीच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना दिला जाईल.
'पोलीस भरती प्रशिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १२० तासांचा लेखी परीक्षेची तयारी करणारा अभ्यासक्रम पदवीच्या दुसर्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल.
UPSC आणि MPSC च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱया विद्यार्थ्यांसाठी २५० तासाचा अँडव्हान्स कोर्स उपलब्ध करून दिला जाईल.
सर्व पद्धतीच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सराव चाचणी परीक्षा महिन्यातून एक या पद्धतीने घेतल्या जातील.
स्पर्धा परीक्षा विषयी तयारी करत असताना योग्य मार्गदर्शन मिळावं यापेक्षा तज्ञ प्रशिक्षकांच्या बरोबरच आजी-माजी सनदी अधिकारी (IAS,IPS,IRS,IFS) यांचे ऑनलाईन मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल. आठवड्याला एक या पद्धतीने ५२ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन दिले जाईल. विद्यार्थ्यांना वेळोवेळी शासकीय नोकर भरतीसाठी निघालेल्या जाहिरातीची माहिती देणे, त्यांची कागदपत्र तयार करण्यासाठीची माहिती देणे तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता करून फॉर्म भरण्या पर्यंतची सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्हा 'पातळीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तसेच निवृत्त अधिकाऱ्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा विषयी फील्ड व्हिजीट आयोजित करून मुलांना जाणीव जागृतीचे काम केले जाईल.


सर्व विद्यार्थ्यांनी YouTube चॅनेल Subscribe करावा आणि पालकांसमवेत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. या मार्गदर्शनाचा प्लॅन A व प्लॅन B ठरवण्यासाठी उपयोग होईल. प्लॅन च्या अंमलबजावणीसाठी करियर कट्टा तुमचा सोबत आहे.
अजित कानशिडे - 9923097483
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत "करिअरच्या संधीचा ऑनलाईन महामेळावा" दिनांक 10 जुलै ते 10 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी शासकीय, निमशासकीय तसेच कार्पोरेट क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध पद्धतीच्या स्पर्धा परीक्षा, उद्योजकता क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन असणारा 30 तासांचा कोर्स दररोज सायंकाळी 06.00 ते 07.00 असणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी https://youtube.com/@uvajagar या लिंक द्वारे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करावे व सदर गुगल फॉर्म भरून आपली नोंदणी करावी, ही विनंती.
https://forms.gle/qttwTKgLk8iBXmQR6