महिलांच्या रोजगाराला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना विविध नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सदर मेळाव्यात फॉक्सकॉन इंडिया लि., बी एफ एस आय बँकिंग, आय बी एफ बँकिंग आणि अनन्या मॅनपावर सोल्युशन अशा विविध कंपन्या सहभागी होणार असून एकूण २२२ जागांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. सदर मेळाव्याची सविस्तर माहिती संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या www.srmcollege.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर मेळाव्यात सहभाग विनामूल्य असून उपस्थितांना आपले ओळख पुरावे, बायोडेटा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार https://forms.gle/X9tkWHu2fpuZPNG7A येथे नोंदणी करू शकतात. हा कार्यक्रम महिलांसाठी आघाडीच्या नियोक्त्यांसोबत त्यांचे करिअर पुढे नेण्याची सुवर्ण संधी आहे. सदर मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांचेकडून करण्यात येत आहे.