क.म.शि.प्र.मंडळ संचलित संत राऊळ महाराज महाविद्याियामध्ये सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षांपासून “ DIPLOMA IN ACTING SKILLS” (अभिनय कौशल्य पदविका ) अभ्यासक्रम सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाचे उद्घाटन सोमवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता सुप्रसिद्ध अभिनेते श्री. भरत जाधव यांच्या हस्ते क.म.शि.प्र.मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.शशिकांत गावडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री.चंदू शिरसाट आणि मुंबई विद्यापीठ, सिंधुदुर्ग उपक्रेंदाचे प्रभारी संचालक प्रा.श्रीपाद वेलिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.डिसले यांनी उद्घाटन समारंभाबद्दल सविस्तर कळविले आहे.रंगमंच आणि छोट्या-मोठ्या पडद्यावरील ‘ अभिनयाचा ’ शास्त्रशुद्ध व्यवसायाभिमुख हा अभ्यासक्रम असून इथल्या विद्यार्थ्यांना तो शिकता यावा तसेच कला व रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने क.म.शि.प्र. मंडळाने महाविद्यालयामध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतला .या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते श्री. भरत जाधव यांना निमंत्रित केले आहे.