सूचना
शैक्षणिक वर्ष 2021-22 वर्षासाठी द्वितीय व तृतीय वर्षाचे प्रवेश आवश्यक प्रवेश शुल्क भरून खालील वेळापत्रकाप्रमाणे महाविद्यालयात कार्यालयीन वेळेत निश्चित करावेत.
-
- महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यापूर्वी प्रथम मुंबई विद्यापीठाच्या mum.digitaluniversity.ac या पोर्टलवर प्रवेशपूर्व नाव नोंदणी करावी. प्रवेशपूर्व नाव नोंदणी करताना User Name 16 अंकी विद्यापीठाचा कायम नावनोंदणी क्रमांक वापरावा. Password जन्मतारीख ( yy/mm/dd) फॉरमॅट प्रमाणे टाकावी. त्यानंतर महाविद्यालयाचा ऑनलाईन प्रवेश अर्ज महाविद्यालयाच्या खालील वेबसाईटवर भरावा.
-
वेबसाईट – http://srm.sindhusolutions.com
- सदर वेबसाईटवर महाविद्यालयाचा प्रवेश अर्ज भरण्यासाठी प्रथम New User मधून Registration करावे व स्वत: चा User Name व Password तयार करावा व पुढील प्रवेश अर्ज भरावा.
- द्वितीय वर्षाचा प्रवेश घेताना सत्र एक व दोन साठी पास अथवा ए.टी.के.टी. असणे आवश्यक आहे.
- तृतीय वर्षाचा प्रवेश अर्ज भरताना प्रथम व द्वितीय वर्षाला पास अथवा किमान दोन वर्षापैकी एक वर्ष पास असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही वर्षाला ए.टी.के.टी.व अनूत्तीर्ण आहेत ते विद्यार्थी तृतीय वर्षाच्या प्रवेशास पात्र ठरणार नाहीत. असे जर कोणी विद्यार्थी असतील तर त्यांनी अधिक माहितीसाठी प्राचार्यांना भेटावे.
- वरील दिलेल्या तारखांना विद्यार्थ्यानी आपले प्रवेश निश्चित करावेत जे विद्यार्थी वरील तारखांना प्रवेश निश्चित करणार नाहीत ते विद्यार्थी यावर्षीच्या प्रवेशापासून वंचित राहिल्यास महाविद्यालय जबाबदार राहणार नाही.