दुःखद निधन:भावपूर्ण श्रद्धांजली
आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी वीरेन पांडुरंग वालावलकर यांचे 29/09/2020 रोजी हृदय विकाराच्या आजाराने दुखद निधन झाले.
2007-2008 या शैक्षणिक वर्षामध्ये त्यांनी F.Y.B.Sc .ला प्रवेश घेतला व 2009-2010 या वर्षी T.Y.B.Sc गणित विषयासह उत्तीर्ण झाले. महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात मोठा सहभाग दर्शविला होता. विविध स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविले होते. एकांकिका, स्किट, माइम आदींचे महविद्यलयामध्ये व शिक्षण पूर्ण झाल्यावर बाहेरही दिग्दर्शन करत होते. सतत हसमुख असणा-या या तरुण युवकाचे दुखद निधन झाले. महाविद्यालयाच्या वतीने त्याना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • Post comments:0 Comments
  • Post category:News