संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे आय.क्यू.ए.सी. हिंदी विभाग व इतिहास विभागातर्फे हिंदीचे सुप्रसिद्ध लेखक कवि ‘फणीश्वर नाथ रेणु यांच्या जन्म शताब्दी वर्षानीमीत्त त्यांच्या सुप्रसिद्ध कथांवर राष्ट्रीय वेबीनारचे आयोजन दिनांक ५ जून २०२० रोजी करण्यात आले होते. ऑनलाइन गुगल मीट अॅप वर आयोजित केलेल्या या वेबीनारचे अध्यक्ष मुंबई विध्यापीठाच्या हिंदी अध्ययन मंडळाचे अध्यक्ष डॅा. अनिलकुमार सिंह होते. डॅा. मोहसीन खान, अध्यक्ष हिंदी विभाग जे. एस. कॉलेज अलिबाग हे प्रमुख पाहुणे होते. या वेबीनार मध्ये डॅा. एल.आय. घोरपडे , कणकवली कॉलेज कणकवली, डॅा. अनंत द्विवेदी साकेत कॉलेज कल्याण, ज्येष्ट संहित्यकार व समीक्षक श्री. शैलेश सिंह, डॅा. चित्रा एस. गोस्वामी. गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी, डॅा. एम.एच.सिद्दिकी व्हि.एन. कॉलेज म्हसळा, रायगड यांनी कथावाचन केले. फणीश्वर नाथ रेणुंच्या पंचलाइट, लालपान की बेगम, ईश्वर रे मेरे बेचारे, संवदिया, पहलवान की ढोलक, ठेस या कथाचे वाचन ,चर्चा समीक्षा करण्यात आली. अध्यक्ष डॅा. अनिलकुमार सिंह यांनी फणीश्वर रेणुंच्या व्यक्तित्व व साहित्यावर प्रकाश टाकला, तर प्रमुख पाहुणे डॅा. मोहसीन खान यांनी सर्व कथांचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या सुरवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. एस.डी. डिसले यांनी मान्यवर व सहभागी प्राध्यापक व साहित्यप्रेमी चे स्वागत केले. आय.क्यू.ए.सी. समन्वयक यांनी वेबीनारचे प्रास्ताविक केले, डॅा. एस.टी.आवटे हिंदी विभाग प्रमुख यांनी सूत्रसंचालन व डॅा. व्हि.जी.भास्कर इतिहास विभाग प्रमुख यांनी आभार मानले. या वेबीनार साठी ११० जण सहभागी झाले होते.
- Post comments:0 Comments
- Post category:News
- Post published:June 8, 2020